विधानपरिषद निवडणूकीच्या गणितात देवेंद्र फडणवीसांची जादू कायम

Jul 13, 2024 - 13:45
Jul 13, 2024 - 13:49
 0
विधानपरिषद निवडणूकीच्या गणितात देवेंद्र फडणवीसांची जादू कायम

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election Result)  गणितात देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis)  जादू कायम असल्याचं पाहायला मिळालं. फडणवीसांचा मॅजिक पॅटर्न सलग तिसऱ्यांदा कायम असल्याचा दिसला. कारण महायुतीचे सर्व 9 उमेदवार विधानपरिषद निवडणुकीत विजयी झाले आहेत.  महायुतीचे उमेदवार योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, अमित गोरखे यांचा विजय झाला. अजित पवारांचे उमेदवार शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर विजयी झाले. तिकडे शिवसेनेच्या भावना गवळी आणि कृपाल तुमानेंनाही गुलाल लागला. 

यापूर्वी देवेंद्र फडणवीसांना महाविकास आघाडीला दोनवेळा धक्का दिला होता. 10 जून 2022 रोजी राज्यसभा तर 20 जून 2022 रोजी विधानपरिषदेच्या निवडणुकीत फडणवीसांनी आपल्या मॅजिक पॅटर्नन  महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला होता. 2022 च्या निवडणुकीचे मुख्य सूत्रधार देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच  महाविकास आघाडी सरकार कोसळलं होतं. यामुळे यंदाही या मतदानाच्या मॅजिक  पॅटर्नची संपूर्ण जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच देण्यात आली होती.

धक्कादायक निकालांचा मॅजिक पॅटर्न 
देवेंद्र फडणवीसांनी 2022 च्या धक्कादायक निकालांचा मॅजिक पॅटर्न पुन्हा एकदा खरा करून दाखवला. 2022 ला राज्यसभा आणि विधानपरिषदेत विजयानंतर आज फडणवीसांनी विजयी हॅट्रिक केली.  महत्त्वाचं म्हणजे सलग 5 टर्म आमदार असणारे शेकापचे जयंत पाटील जे शरद पवार पुरस्कृत उमेदवार होते, त्यांनाही महायुती आणि फडणवीसांनी धोबीपछाड दिली.

कोणकोणते उमेदवार विजयी?  

भाजपचे विजयी उमदेवार 

1) योगेश टिळेकर - 26 मते
2) पंकजा मुंडे - 26 मते
3) परिणय फुके- 26 मते
4) अमित गोरखे - 26 मते
5) सदाभाऊ खोत - 24

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार 

1) भावना गवळी -24
2) कृपाल तुमाने- 25

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) 

1. शिवाजीराव गर्जे - 23
2. राजेश विटेकर -23 

काँग्रेस विजयी उमेदवार

1) प्रज्ञा सातव - 26

विधानपरिषद निकालाची वैशिष्ट्ये

  • काँग्रेसची एकूण 8 तं फुटली
  • दोन वर्षानंतर पुन्हा एकदा फडणवीस यांचा राजकीय वरचष्मा 
  • शरद पवारांना अजित पवारांचं एकही मत फोडता आलं नाही
  • उद्धव ठाकरेंना शिंदे यांचं एकही मत फोडता आलं नाही
  • भाजपचे तरूण चेहरे विधानपरिषदेत दिसणार
  • पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन
  • अमित गोरखेंच्या रूपानं मातंग समाजातील तरूण चेहरा विधानपरिषदेत
  • योगेश टिळेकर यांच्या माध्यमातून माळी समाजाला नेतृत्व
  • सदाभाऊ खोत यांच्या रूपात शेतकरी आणि चळवळीत कार्यकर्ता पुन्हा आमदार 

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:11 13-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow