दिवा पॅसेंजरमधून लॅपटॉप चोरीला
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गाने धावणाऱ्या दिवा-रत्नागिरी पॅसेंजर गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशाची लॅपटॉप असलेली बॅग चोरट्याने लांबवल्याचा प्रकार १२ जुलै रोजी उघडकीस आला. या प्रकरणी रत्नागिरी येथील ग्रामीण पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दिवा पॅसेंजर गाडीतून दिवा ते रत्नागिरी असे एक व्यक्ती प्रवास करीत होती. संगमेश्वर रेल्वे स्टेशनपर्यंत त्याच्यासोबत बॅग होती. मध्यरात्री दीड ते अडीच वाजण्याच्या दरम्यान पॅसेंजर संगमेश्वर स्टेशन ते भोके स्टेशन दरम्यान आली असता, चोरट्याने २५ हजाराचा डेल कंपनीचा लॅपटॉप चोरट्याने लांबवला. या प्रकरणी संबंधिताने रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:30 15-07-2024
What's Your Reaction?