लॅपटॉप चोरणाऱ्या संशयिताला पोलिस कोठडी

Jul 6, 2024 - 10:45
 0
लॅपटॉप चोरणाऱ्या संशयिताला पोलिस कोठडी

रत्नागिरी : रेल्वे प्रवासादरम्यान महिलेचा लॅपटॉप लांबवल्या प्रकरणातील संशयिताला न्यायालयाने ६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. चोरीची ही घटना ६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ४.५० ते ५ वा. कालावधीत उक्षी रेल्वेस्टेशन दरम्यान घडली होती. 

प्रसाद जगन्नाथ पाटील (३०, रा. भेरसे अलीबाग, रायगड) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. या बाबत जे. दिशा रणजीत (रा. कर्नाटक) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. 

त्यानुसार, दि. ६ एप्रिल रोजी त्या सुरत ते मंगळुरू असा ट्रेनने प्रवास करत असताना ही घटना घडली होती. चोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या जगन्नाथ पाटील याला या गुन्ह्यात वर्ग करून शुक्रवारी ग्रामीण पोलिसांनी हजर केले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 06-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow