रत्नागिरी : जिल्ह्यात 'मनरेगा' फळबाग लागवडीची अंमलबजावणी

Jul 16, 2024 - 17:24
Jul 16, 2024 - 17:27
 0
रत्नागिरी : जिल्ह्यात 'मनरेगा' फळबाग लागवडीची अंमलबजावणी

रत्नागिरी : कृषी हवामान, रोजगार निर्मिती व उच्च मूल्यांकित पीक रचना या सर्व बाबींचा विचार करून तसेच शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती घडविणे व पडीक जमिनीचा विकास या हेतूने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेशी (मनरेगा) निगडित फळबाग लागवड योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील हवामान, फळझाडे, भाजीपाला आणि मसाला पिकांच्या उत्पादनास अत्यंत अनुकूल असून या पिकांचे क्षेत्र, उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टिने केंद्र व राज्य शासन पुरस्कृत वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. रत्नागिरी जिल्हा फलोत्पादनाच्या दृष्टिने महत्त्वाचा असून आंबा, काजू, व नारळ ही मुख्य फळपिके आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फलोत्पादनाखालील एकूण क्षेत्र १,६४,४६८ हेक्टर आहे. त्यापैकी आंबा फळपिकाखाली ६५,५६१ हेक्टर काजू ९२, ४५५ हेक्टर, नारळ ५,१९९ हेक्टर, चिकू ११२९ हेक्टर व इतर फळपिकाखालील १.१२६ हेक्टर क्षेत्र आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात फळबाग लागवडीखालील क्षेत्र ३८, ६४४ हेक्टर होते. रो. ह. योजनेंतर्गत फळबाग लागवडीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यात १,२७,१६३ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेली असून एकूण १,५१,२१७ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ झाला आहे. या योजनेंतर्गत एकूण रुपये १२८४९.५२ लाख अनुदान वाटप करण्यात आले आहे. योजनेंतर्गत खालील पिकांची लागवड करण्यास मान्यता दिलेली आहे. आंबा, काजू, चिकू, नारळ, पेरु, बोर, सीताफळ, आवळा, चिंच, फणस, कोकम, जांभूळ, कवठ, जोजोबा, बांबू, जट्रोफा, सुपारी सलग पीक, तेलताड, रबर मसाला पिके आंतरपिके व औषधी-सुगंधी वनस्पती आयरन अजूंना अशोका, बेल, गुग्गुळ, लोध्रा, रक्तचंदन, शिवण, टेटू बेहडा, बिब्बा, डिकेमली, हिरडा, रिठा वावडींग, करंज, पनपिंपरी रत्नागिरी जिल्ह्यासाठी प्रती लाभार्थी कमीत कमी ०.१० हेक्टर व जास्तीतजास्त १० हेक्टरपर्यंत लागवडीचा लाभ घेण्यासाठी मर्यादा आहे. नारळ बागेत मसाला आंतरपीक व भात खाचराच्या बांधावर फळझाड लागवड करण्यासाठी प्रती लाभार्थी कमीतकमी ०.१० हेक्टर व जास्तीत जास्त २.०० हेक्टर इतक्या क्षेत्रावर लाभ मिळतो.

आंबा, काजू, नारळ, सुपारी या पिकावरील सर्व कीड व रोग नियंत्रणासाठी खरेदी केलेल्या कीटकनाशकावर ५० टक्के अनुदान देय आहे. या योजनेंतर्गत ३००० हेक्टर क्षेत्रासाठी कीटकनाशके उपलब्ध करुन देण्यात आली असून रुपये २०.०० लाख अनुदान खर्च झालेला आहे. चालू आर्थिक वर्षात २०.०० लाख रकमेचा कार्यक्रम प्रस्तावित आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:38 PM 16/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow