टिके येथे दुचाकी घसरून तरुण जखमी

Jul 19, 2024 - 12:18
 0
टिके येथे दुचाकी घसरून तरुण जखमी

रत्नागिरी : तालुक्यातील टिके येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात कोल्हापूर येथील तरुण जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून अपघाताची ही घटना गुरुवार १८ जुलै रोजी सकाळी ११ वा. घडली.

 सुदाम विष्णू जगताप (३६, रा. कोल्हापूर) असे अपघातातील जखमीचे नाव आहे. सुदाम जगताप हे मेडिकल रिप्रेसेंटेटिव्ह म्हणून कोल्हापूरमध्ये कामाला आहेत. काही कामानिमित्त ते आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच ०९-बीजे-८१३८) घेऊन रत्नागिरीत आले होते. गुरुवारी सकाळी ते टिके रत्नागिरी असे असा प्रवास करत असताना त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला त्यामुळे दुचाकी घसरून हा अपघात झाला. 7476 यात त्यांच्या छातीला मुक्का मार लागल्याने ते बेशुद्ध होऊन पडले होते. तेथील नागरिकांनी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून, सायंकाळी ते शुद्धीवर आले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 19-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow