रत्नागिरी : रोपवाटिकांसाठी पावणेदोन लाखाचे अनुदान प्रस्तावित

Jul 16, 2024 - 17:23
 0
रत्नागिरी : रोपवाटिकांसाठी पावणेदोन लाखाचे अनुदान प्रस्तावित

रत्नागिरी: जिल्ह्यातील ७ शासकीय फळ रोपवाटिका अस्तित्वात असून, शासकीय रोपवाटिकांचे बळकटीकरण करणे योजनेंतर्गत शासकीय रोपवाटिकांवरील कलम व रोपांच्या उत्पादनात गुणात्मक व संख्यात्मक वाढ करण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा, सिंचन सुविधा, तांत्रिक व यांत्रिक सुविधा या बाबींचा विकास करण्यासाठी रोपवाटिकांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. गतवर्षी रोपवाटिकांचे बळकटीकरण करण्यासाठी अडीच लाखांचा निधी खर्च करण्यात आलेला आहे. चालू आर्थिक वर्षात पावणेदोन लाखाचे अनुदान प्रस्तावित करण्यात आले आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:51 PM 16/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow