अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुरु

Jul 17, 2024 - 10:04
Jul 17, 2024 - 11:20
 0
अभियांत्रिकी  प्रवेश प्रक्रिया सुरु

रत्नागिरी :  सध्या सीईटी परीक्षांचा निकाल लागला असून, विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची हुरहूर लागली होती. आता ही हुरहुर संपली असून, बहुतांश व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया रविवार दि. १४ जुलै रोजी सुरू झाली आहे. मात्र, कृषी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेबाबत अद्याप काहीच सूचना नसल्याने विद्यार्थ्यांची प्रतीक्षा कायम आहे.

राज्यातील सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत स्तरावर राबवली जात असल्याने प्रवेश परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारवर प्रवेश निश्चिती केली जाते. जुन अखेरीस सर्वच प्रवेश परीक्षा घेऊन त्यांचे निकालही जाहीर झाले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची लागलेली हुरहूर आता संपली असून, व्यावसायिक बहुतांश अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. नुकतेच सीईटी सेलने संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.

कैंप राऊंडसाठी प्रवेश नोंदणी सुरू झाली असली तरी पुढील प्रक्रियेबाबत अद्याप कोणतीच माहिती सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध नाही. मात्र, कृषी अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर झाले नसल्याने प्रवेशइच्छुकांची प्रतीक्षा कायम आहे. नीट परीक्षेबाबत ठोस निर्णय होत नसल्याने वैद्यकीय प्रवेशही लटकले आहेत.

या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू
सीईटी सेलच्या वेळापत्रकानुसार बीएचएमसीटी, ३ वर्षे एलएलबीचे प्रवेश सुरू झाले असून एमबीए, एमएमएस, बी डिझाईन, बीएड-एमएड, बी.पी.एड., एम.एड., बी. फार्मसी यांची प्रवेश नोंदणी दि. १२ जुलै तर एम.एच.एम.सी.टी. बी. एड. ची दि. १३ जुलैला प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. बीए अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया दि. १४ जुलैपासून सुरू झाली आहे. अभियांत्रिकीच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशासाठी दि. १५ जुलैपासून तर औषध निर्माणच्या थेट दुसऱ्या वर्षासाठी दि. १६ जुलैपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 17/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow