घरात प्रवेश करत विवाहितेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; संशयितावर गुन्हा

Jul 17, 2024 - 10:36
 0
घरात प्रवेश करत विवाहितेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; संशयितावर गुन्हा

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे-तळेवाडी येथे विवाहितेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयिताविरोधात नाटे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १३ जुलै रोजी रात्री १०.३० ते ११ वा. कालावधीत घडली आहे.

संतोष यशवंत शिंदे (४२, रा. देवाचे गोठणे-तळेवाडी, राजापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी रात्री तिने आपल्या दोन्ही मुलांना भरवून झोपवले. त्यानंतर स्वतःचे जेवण करून भांडी घासून झोपण्यापूर्वी बाथरूमला जाण्यासाठी मोरीमध्ये गेली असता, घराच्यावरील मोकळ्या भागातून संशयिताने त्यांच्या घरात प्रवेश केला. त्याने पीडितेचा हात पकडून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याप्रकरणी संशयिताविरोधात नाटे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 17-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow