विलास रहाटे यांनी मोरपिसावर साकारली विठ्ठल प्रतिमा
साखरपा : कलाकार हा आपल्या कलेतून आपली भक्ती व्यक्त करत असतो. आपल्या कलेची साधने ही त्याची भक्ती व्यक्त करण्याची माध्यमे असतात. देवरूख येथील रांगोळीकार आणि चित्रकार विलास रहाटे यांनी मोरपिसावर विठ्ठल प्रतिमा साकारली आहे.
विठ्ठलाच्या मुकुटात मोरपीस पाहावयास मिळते. त्यामुळे रहाटे यांनी कागद अथवा कॅन्व्हासचा वापर न करता मोरपिसावर विठ्ठल प्रतिमा साकारली आहे. अवघ्या एक इंच एवढ्या लहान जागेवर रहाटे यांनी ही प्रतिमा साकारली आहे. त्यासाठी अॅक्रेलिक रंगांचा वापर केला आहे. आज असलेल्या आषाढी एकादशीनिमित्त रहाटे यांनी आपल्या कलेतून ही प्रतिमा साकारत विठ्ठलाला वंदन केले आहे. मागील वर्षीही रहाटे यांनी तुळशीपत्रावर अशीच एक विठ्ठल प्रतिमा साकारली होती. त्या प्रतिमेप्रमाणेच यंदा साकारलेल्या मोरपिसावरील प्रतिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 17-07-2024
What's Your Reaction?