शरद पवारांनी मराठा समाजाला सर्वात जास्त फसवलं, त्यांच्यापुढं शकुनी मामा फेल; भाजप आमदाराची टीका

Jul 17, 2024 - 11:30
 0
शरद पवारांनी मराठा समाजाला सर्वात जास्त फसवलं, त्यांच्यापुढं शकुनी मामा फेल; भाजप आमदाराची टीका

मुंबई : मराठा समाजाला सर्वात जास्त फसवणारा बेईमान नेता हे शरद पवार (Sharad Pawar) असल्याची टीका भाजप आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर (Babanrao Lonika ) यांनी केली आहे.

त्यांच्यासमोर शकुनी मामा देखील फेल आहे असं लोणीकर म्हणाले. परतूर येथील भाजप कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बबनराव लोणीकर बोलत होते.

दरम्यान मराठा आणि ओबीसीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे भांडण लावत असल्याचा आरोप देखील बबनराव लोणीकर यांनी केला. तसेच या तिन्ही पक्षांना शिव्यांची लाखोली देखील लोणीकरांनी वाहिली. जातीपातीच्या बहकाव्यात येऊ नका, काँग्रेसवाले बेईमान आहेत, तर उद्धव ठाकरेंची शिवसेनावाले बेबनाव करणारे आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसलाही लोणीकरांनी शिव्यांची लाखोली वाहीली आहे.

महाविकास आघाडीच्या सरकारनं मराठा आरक्षण घालवलं

मराठा आरक्षण हे आपल्या सरकारनं दिल्याचे बबनराव लोणीकर म्हणाले. पण महाविकास आघाडीच्या सरकारनं ते आरक्षण घालवल्याचे लोणीकर म्हणाले. उद्धव ठाकरे हे खोटं पण रेटून बोलत आहेत. आम्ही सारे हिंदू एक आहोत. मोदींजींना सबका साथ सबका विकास हा नारा दिला आहे. त्याप्रमाणे काम सुरु असल्याचे लोणीकर म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:56 17-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow