एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरांमध्ये दर्शन सोहळा
चिपळूण : आषाढी एकादशीनिमित्त चिपळूण शहर परिसरात बुधवार दि. १७ रोजी विविध मंदिरात विठ्ठल-रखुमाई दर्शन व पूजा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आषाढी एकादशी म्हटली की वारकऱ्यांना विठ्ठल दर्शनाची आस लागून राहते. अनेक भाविक आणि वारकरी पायी दिंडीद्वारे पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी प्रवास करीत असतात. मात्र, ज्यांना शक्य नाही असे पांडुरंगाचे भक्त आपापल्या नजिकच्या मंदिरात पांडुरंगाच्या दर्शनासाठी हजेरी लावतात.
चिपळूण शहर परिसरामध्ये विठ्ठल-रखुमाईची मंदिरे आहेत. पेठमाप, नामदेव समाजोन्नती सभागृह, खंड महालक्ष्मी नगर, पाचमाडकर विठ्ठल-रखुमाई मंदिर खंड, खेडर्डी दत्त मंदिर, पाग आदी परिसरात विठ्ठल मंदिर असून, या मंदिरातून आषाढी एकादशीनिमित्त सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 17-07-2024
What's Your Reaction?