साखरपा येथील बिबट्याच्या हल्ल्यातील जखमीला ५ लाखांची वनविभागातर्फे मदत

Jul 17, 2024 - 11:01
Jul 17, 2024 - 12:08
 0
साखरपा येथील बिबट्याच्या हल्ल्यातील जखमीला ५ लाखांची वनविभागातर्फे मदत

साखरपा : येथील ग्रामस्थ अमित जाधव हा मागील महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाला होता. त्याच्या उपचारासाठी वनविभागाकडून पाच लाखांचा धनादेश देण्यात आला आहे. जूनमध्ये अमित जाधव या साखरपा जाधववाडी येथे राहणाऱ्या नागरिकावर बिबटयाने हल्ला केला होता. यात अमित जाधव यांना मोठी दुखापत झाली होती. त्यांना तत्काळ खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

या घटनेची दखल सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांनी घेतली. त्यांनी वनविभागाचा सातत्याने पाठपुरावा केला. वनाधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या आणि कार्यवाहीची मागणी केली. अमित यांच्यावर झालेल्या हल्ल्याची तीव्रता लक्षात घेता त्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, यासाठी त्यांनी वनविभागाला सूचना दिल्या. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, वनविभागाने अमित जाधव यांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. नुकताच पाच लाखांचा धनादेश वनविभागातर्फे त्याला देण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 PM 17/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow