मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षामधून रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांना ४ कोटी ३८ लाखांची मदत

Sep 4, 2024 - 12:24
Sep 4, 2024 - 12:55
 0
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षामधून रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांना ४ कोटी ३८ लाखांची मदत

रत्नागिरी : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षामधून मागील अडीच वर्षात जिल्ह्याला जवळपास ४ कोटी ३८ लाखांचा तर एकट्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील २१८ रुग्णांना १ कोटी ३९ लाखांची मदत देण्यात आली असल्याची माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्याचे कक्षप्रमुख रामहरी राऊत यांनी दिली.

रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या रामहरी राऊत यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाबद्दल माहिती दिली. 

या योजनेसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षासाठी आवश्यक कागदपत्रांचीही माहिती दिली. तब्बल २० आजारांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. अपघात, अपघात शस्त्रक्रियांसाठी या योजनेमधून मदत मिळते. या योजनेमधून अर्थसहाय्य मिळविण्याची प्रक्रिया संपूर्णतः निःशुल्क आहे. तरी यासाठी रुग्णांनी थेट अर्ज करावेत असे आवाहनही त्यांनी केले. जिल्ह्यात जवळपास ४ कोटी ३८ लाखाचा निधी मिळाला त्यातील रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील २१८ रुग्णांना १ कोटी ३९ लाख २५ हजाराचा निधी मिळाला.

याकामी पालकमंत्री उदय सामंत स्वीय सहाय्यक महेश सामंत यांनी यांचे वेळोवेळी प्रत्येक रुग्णासाठी मोठी धडपड केल्याचे रामहरी राऊत यांनी सांगितले. रत्नागिरीतून येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची माहिती, कोणत्या डॉक्टरकडे, हॉस्पिटलमध्ये रुग्ण आहे याचे सर्व अपडेटस महेश सामंत सातत्याने देत असतात व झालेल्या कार्यवाहीबाबत माहिती घेऊन रुग्णांच्या नातेवाईकांना देत त्यांचे समाधान करण्याचाही तेवढाच प्रयत्न करीत असतात असेही राऊत यांनी सांगितले. यावेळी सागर भिंगारे हा रुग्णात रुग्णांसाठी करीत असलेल्या धावपळीचेही त्यांनी कौतुक केले. या पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख राहूल पंडीत व महिला जिल्हाप्रमुख शिल्पा सुर्वे उपस्थित होत्या. जिल्ह्यातील गोरगरीब सर्वच रुग्णांनी या हेल्पलाईनचा लाभ घ्यावा, त्यांच्या उपचाराच्या खर्चा पोटी होणारा तणाव कमी करण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी यात विशेष लक्ष दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 04/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow