सदनिका खरेदीत २३ लाखांची फसवणूक

Jul 18, 2024 - 10:05
 0
सदनिका खरेदीत २३ लाखांची फसवणूक

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील इमारतीत ३ सदनिका विकत घेण्यासाठी २३ लाख रुपये घेऊनही त्याबाबतचे साठेखत तयार न करता त्या सदनिका परस्पर विक्री केल्याप्रकरणी महिलेविरोधात येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीची ही घटना २१ सप्टेंबर २०२१ ते १६ जुलै २०२४ या कालावधीत शहरानजीकच्या गयाळवाडी येथे घडली आहे.

अश्विनी महेश ओझा (रा. इचलकरंजी, ता. हातकणंगले, कोल्हापूर) असे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. तिच्याविरोधात शेखर शांताराम म्हाप (५९, रा. नागपूर पेठ, हातखंबा, रत्नागिरी यांनी मंगळवार १६ जुलै रोजी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

त्यानूसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यात सप्टेंबर २०२१ मध्ये फिर्यादीच्या हातखंबा येथील कार्यालयामध्ये सदनिका खरेदी करण्याबाबत बोलणी झाली होती. त्या नंतर १ एप्रिल २०२४ मध्ये चिपळूण तालुक्यातील आगवे वहाळ फाटा, सावर्डे येथे प्रत्यक्ष इमारतीचे बांधकाम सुरु झाले होते. त्या ठिकाणी जाऊन फिर्यादी आणि संशयित यांच्यात स्टील्टवरील पहिल्या मजल्यावरील तीन सदनिका ४० लाख रुपयांना घेण्याचे ठरले होते. या व्यवहारात संशयित महिला अश्विनी ओझा हिने फिर्यादीचा विश्वास संपादन करत आपल्या खात्यात प्रथम २० लाख ५० हजार आणि त्यानंतर २ लाख ५० हजार असे एकूण २३ लाख रुपये जमा करुन घेतले. परंतु, एक वर्षानंतर आरोपीने साठेखत अगर खरेदीखत करुन देण्यासाठी वेगेवगळी कारणे सांगून टाळाटाळ केली. य फिर्यादीने पुन्हा पुन्हा विचारणा केल्यावर तिने भागिदारांना सांगून तुम्हाला नोंदणीकृत दस्तऐवज करुन देते, असे सांगितले होते. परंतु, त्या तिन्ही सदनिका अन्य व्यक्तिला विक्री करुन संशयित महिलेने विश्वासघात करत फिर्यादीची फसवणूक केली.
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 18-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow