ओमानमध्ये बुडालेल्या जहाजात कसब्यातील तरुण?

Jul 18, 2024 - 10:11
 0
ओमानमध्ये बुडालेल्या जहाजात कसब्यातील तरुण?

रत्नागिरी : ओमानमधील बुडालेल्या जहाजामध्ये १३ भारतीय कर्मचारी बेपत्ता आहेत. त्यात एक संगमेश्वर तालुक्यातील ४० वर्षीय व्यक्तीचा समावेश असल्याचे समजते.

सोमवारी सायंकाळी हे जहाज बुडाले. त्यावर १३ भारतीय कर्मचारी होते. बुडालेल्या कर्मचाऱ्यांचा सर्व साधनांचा पर्याय वापरुन शोध घेतला जात आहे. मात्र ४८ तास उलटून गेल्यानंतरही त्यांचा पत्ता लागलेला नाही. या १३ कर्मचाऱ्यांमध्ये कसबा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. तो ज्या कंपनीत कामाला होता, त्या कंपनीकडून त्याच्या नातेवाईकांना या प्रकाराची माहिती देण्यात आल्याचे समजते. हा कर्मचारी अजूनही बेपत्ता असल्याचे कंपनीने कळवले असल्याचे समजते.
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 18-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow