संगमेश्वर : वाशीफाटा येथे दुचाकीची रिक्षाला ठोकर

May 30, 2024 - 14:34
 0
संगमेश्वर : वाशीफाटा येथे दुचाकीची रिक्षाला ठोकर

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील तेरे वाशीफाटा येथील दुचाकीने रिक्षाला ठोकर दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. संगमेश्वर पोलिस ठाण्यात स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष नारायण डिंगणकर (रा. तेरे-बुरंबी, ता. संगमेश्वर) असे संशयित स्वाराचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २१) सकाळी दहाच्या सुमारास तेरे-वाशी फाटा येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सुभाष डिंगणकर हा दुचाकी (क्र. एमएच-०८ एई ३५१८) घेऊन वाशी तर्फे संगमेश्वर असा घेऊन जात असताना संगमेश्वर ते देवरुख जाणारी रिक्षा क्र. एमएच-०८ ए.क्यू ९९७९) हिला समोरुन डाव्या बाजूला जोरदार ठोकर दिली या अपघातात स्वार जखमी झाला तर दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या प्रकरणी पोलिस नाईक विनय मनवल यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:03 30-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow