राजापूर : कशेळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दीप्ती हळदणकर यांची बिनविरोध निवड

Jul 18, 2024 - 10:39
Jul 18, 2024 - 14:42
 0
राजापूर : कशेळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दीप्ती हळदणकर यांची बिनविरोध निवड

राजापूर : तालुक्यातील कशेळी ग्रामपंचायतीमध्ये नुकत्याच झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या दीप्ती हळदणकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

शिवसेना उबाठा गटाच्या सरपंच सोनाली मेस्त्री यांनी सरपंच पदासह सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी शुक्रवारी पोटनिवडणूक घेण्यात आली. ओबीसी स्त्री राखीव सरपंचपदासाठी भाजपाकडून दीप्ती हळदणकर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार दीपाली पंडीत यांनी दीप्ती हळदणकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर केली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, रवींद्र नागरेकर, सुरेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली हळदणकर यांची बिनविरोध निवड पार पडली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:08 PM 18/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow