दापोली : काटकरवाडीतील पूल गेला वाहून

Jul 27, 2024 - 10:06
Jul 27, 2024 - 11:39
 0
दापोली : काटकरवाडीतील पूल गेला वाहून

दापोली : मुसळधार पावसामुळे दापोली तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे घर, गोठ्यांचे नुकसान झाले असून कुडावळे काटकरवाडी येथील छोटा पूल वाहून गेल्यामुळे १० कुटुंबांचा ये-जा करण्याचा मार्ग बंद झाला आहे.

अतिवृष्टीमुळे वणीशीतर्फे नातू (गाववाडी) गावात जास्त पाऊस झाल्यामुळे झाड तुटून हनुमान मंदिराचे साहित्य ठेवण्यासाठी बांधलेल्या खोलीवर झाड कोसळले, सातेरीतर्फे हवेली येथे महादेव बाळू बेंडल यांच्या घराचे अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे भरपूर नुकसान झाले आहे. साखळोली येथील मंगेश देवघरकर यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले आहे. माटवण येथील शिवाजी नारायण महाडिक यांच्या गोठ्याची पावसामुळे भिंत पडली, उफीं येथील विठ्ठल जयराम जाधव यांच्या घराचे पत्रे व कौलांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. जालगांव ब्राह्मणवाडी येथील रस्त्यावर मोठे झाड कोसळल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता; परंतु ते लगेच बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली,

शिरखल येथे रामचंद्र वारत शिंदे यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले आहे. चिंचाली येथे विजेचा शॉक लागून गायीचा मृत्यू झाला आहे. कुडावल काटकरवाडी येथील वाडीला जोडणारा छोटा पुल वाहून गेल्यामुळे १० कुटुंबांचा ये-जा करण्याचा मार्ग बंद झाला आहे. तेथील तात्पुरती दुरुस्ती करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

किनारी भागांना लाटांचा तडाखा
वेगवान वाऱ्यांमुळे समुद्राला उधाण आले होते. ४ ते ५ फुटांपर्यंत लाटा उसळत होत्या किनारपट्टीलगत असणाऱ्या कोळथर ते अगदी केळशीपर्यंत असलेल्या लाडघर, आंजर्ले व मुरूडसारख्या किनारपट्टीजवळ असणाऱ्या बागांमध्ये व किनाऱ्याला राहणाऱ्या वस्तीतील घरांमध्ये समुद्राच्या उधाणाचे पाणी घुसले होते. येथील ग्रामस्थांमधून भीती निर्माण झाली होती.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 27/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow