सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे “खेकडा पालन: व्यवस्थापन” प्रशिक्षण कार्यक्रम सुरु

Jul 19, 2024 - 09:34
 0
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे “खेकडा पालन: व्यवस्थापन” प्रशिक्षण कार्यक्रम सुरु

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ, दापोली अंतर्गत ‘झाडगाव रत्नागिरी येथे असलेल्या ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र मध्ये “खेकडा पालन: व्यवस्थापन” या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दि. १८ ते २० जुलै, २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उदघाटन समारंभ दि. १८  जुलै, २०२४ रोजी सकाळी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी व प्रमुख डॉ. सुरेश नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पार पडला. यावेळी डॉ. सुरेश नाईक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्रशिक्षानार्थिना प्रशिक्षणामध्ये मिळणाऱ्या ज्ञानाचा फायदा करून त्यांनी व्यवसाय सुरू करावेत असे आवाहन केले. 

तसेच भविष्यातहि संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांकडून प्रशिक्षानार्थिना असेच पुढील मार्गदर्शन देखील मिळेल याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण कार्यक्रम समन्वयक डॉ. हरिष धमगाये यांनी केले. उदघाटन  कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन, सहयोगी संशोधन अधिकारी डॉ. आसिफ पागरकर यांनी केले तर सूत्रसंचालन सहाय्यक संशोधन अधिकारी प्रा. सचिन साटम यांनी केले. यावेळी संशोधन केंद्राचे सहाय्यक संशोधन प्रा. नरेंद्र चोगले आणि जीवशास्त्रज्ञ श्रीमती. व्ही. आर. सदावर्ते हे उपस्थितीत होते. या कार्यक्रम प्रसंगी गुहागर येथील यशस्वी खेकडा संवर्धक श्री. प्रसन्न गवंडे यथोचित सत्कार करण्यात आला.

या प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून विशेषतः मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग व रत्नागिरी येथील एकूण २७ प्रशिक्षणांर्थीनी सहभाग नोंदविला. या प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत तीन दिवसात खेकडा पालन संच हाताळणी व व्यवस्थापन, खेकडा पालनः सद्यस्थिती व वाव, खेकड्यांच्या जातींची ओळख व जीवनचक्र, जिवंत खेकडा पालन संच हाताळणी, पाण्याचे गुणधर्म आणि व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन, अर्थशास्त्र व प्रकल्प अहवाल कसा तयार करावा, खेकडा काढणी व काढणी पश्चात काळजी तसेच विक्री व्यवस्थापन या विषयावर तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 

हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजनाकरिता डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे आदरणीय कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. पराग हळदणकर, संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन करिता संशोधन केंद्रातील कर्मचारी श्रीमती जाई साळवी, श्री. सचिन पावसकर, श्री. मंगेश नांदगावकर, श्री. महेश किल्लेकर, श्री. मनिष शिंदे,  श्री. दिनेश कुबल, श्री मुकुंद देऊरकर, श्री. राजेंद्र कडव, श्री. सुहास कांबळे, श्री. सचिन चव्हाण, श्री. प्रवीण गायकवाड, श्री. तेजस जोशी, श्री. स्वप्नील आलीम, श्री. योगेश पिलणकर, श्री. अभिजित मयेकर यांनी विशेष सहकार्य केले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 AM 19/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow