आंबा घाटात दरड कोसळून वाहतूक विस्कळीत

Jul 19, 2024 - 10:21
 0
आंबा घाटात दरड कोसळून वाहतूक विस्कळीत

रत्नागिरी : वेगवान वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे काजळी नदी धोका पातळी ओलांडून वाहत होती. त्यामुळे किनारी भागात पुराचे पाणी शिरले. लांजा मठ येथील दत्त मंदिर तर चांदराई येथील बाजारेपठेत पाणी शिरले होते. सुमारे चार तासानंतर पुराचे पाणी ओसरले. रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक एक दिशा मार्गाने सुरू होती. जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत सरासरी १०१.१४ मिमी पावसाची नोंद झाली. 

त्यामध्ये मंडणगड ७५.६०, दापोली ८७.४०, खेड ८०.१०, गुहागर ८६.२०, चिपळूण ८२.२०, संगमेश्वर १३१.४०, रत्नागिरी १४८.७०, लांजा ११९.००, राजापूर ९९ मिमी नोंद झाली. गेले दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला होता. त्यामुळे लावणीच्या कामांना वेग आला आहे. काल रात्री मुसळधार पावसाने रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर या तीन तालुक्यांना झोडपले. शास्त्री, गडनदी दुथडी भरून वाहत होती. पावसाचा जोर आंबा घाटातही सुरू राहिल्यामुळे काजळी नदीला पूर आला. पुराचे पाणी किनारी भागातील भात शेतीमध्ये शिरले होते. मठ येथील दत्त मंदिर पाण्याखाली गेले होते. पुढे चांदराई बाजारपेठेत पहाटेच्या सुमारास पुराचे पाणी भरण्यास सुरवात झाली. दीड ते दोन फूट पाणी होते. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पूरही ओसरला. पुराच्या भीतीमुळे बाजारातील दुकानदारांनी साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरवात केली. पहाटेच्या सुमारास व्यावसायिकांची तारांबळ उडाली. पुराचे पाणी चार ते पाच तास होते. दुपारी पावसाचा जोर कमी झाला. त्यानंतर पूर ओसरला. त्यामुळे व्यावसायिकांनी निःश्वास सोडला.

पावसामुळे दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आंबा घाटात कलकदरानजीक दरड कोसळली आहे. घाट परिसरात कालपासून पडत असलेल्या अती पावसामुळे डोंगरातील माती भुसभुशीत झाल्याने दरड कोसळली. ही घटना घडली तेव्हा काहीवेळात एक ट्रक पुढे निघून गेला होता. त्यानंतर काही वेळातच ही दरड कोसळली. हा प्रकार घडल्यानंतर काही काळ वाहतूक एक दिशेने सुरू ठेवण्यात आली होती.

मातीमुळे सर्वत्र चिखल
घाटात खोदकाम करत असलेला एक जेसीबी ताबडतोब घटनास्थळी मागवण्यात आला आणि त्यामाध्यमातून दरड बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. दरड बाजूला करण्यात आली असली तरीही त्या परिसरात वाहून आलेल्या मातीमुळे सर्वत्र चिखल झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 19/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow