रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

Jul 19, 2024 - 10:17
 0
रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

रत्नागिरी : बुधवारी रात्रीपासूनच रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर गुरुवारीही कायम होता. पाऊस जोरदार सक्रिय झाल्याने यंदाच्या पाऊस हंगामात तिसऱ्यांदा प्रमुख नद्यांतील वाढलेल्या जलस्तराने पूरसदृश स्थिती निर्माण केली. जोरदार पावसाने चार कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर बुधवारनंतर गुरूवारीही रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने झोडपून काढले. पावसाला जोरदार वाऱ्याचीही साथ असल्याने किनारी भागात जोरदार लाटाही प्रभावीत झाल्या. खेड तालुक्यात जगबुडीचा जलस्तर इशारा पातळीच्या वर गेल्याने पुन्हा खेड बाजारपेठ आणि भरणे नाक्याचा काही भागात पूरसृश्य स्थिती निर्माण झाली. जगबुडी नदीची इशारा पातळी ५ मिटर ते ७ मिटर आहे. या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने सकाळी ११ वाजता आपत्ती नियंत्रण विभागाच्या नोंदीनुसार जगबुडी नदीचा जलस्तर इशारा पातळीच्यावर एक मिटरने वाढला होता. रत्नागिरी आणि लांजा तालुक्यांनाही जोरदार पावसाचा तडाखा बसला. या दोन तालुक्यात एकाच दिवसात दिडशे मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे लांजा तालुक्यातून वाहणारी आणि रत्नागिरी तालुक्याच्या किनारी भागात सामावणाऱ्या काजळी नदीचा जलस्तरही धोका पातळीच्यावर गेला. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील चांदराई, सोमश्वर, हरचेरी, पामेंडी या गावात पुन्हा पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. चांदेराई बाजारपेठेतही पाणी वाढले असून सोमेश्वर बांधावरही काजळीचा जलस्तर वाढला आहे. किनारी भागातील रत्नागिरी आणि राजापूर या दोन तालुक्यासह लांजा आणि संगमेश्वर या दुर्गम भगातील जिल्ह्याना पावसाने झोडपून काढले. या चार तालुक्यात १०० मि.मी. पेक्षा जात पावसाची नोंद झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 19-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow