राधाकृष्ण पतसंस्थेच्या वतीने भागेश्वर विद्यामंदिरात शैक्षणिक साहित्याचे वाटप

Jul 19, 2024 - 14:44
 0
राधाकृष्ण पतसंस्थेच्या वतीने भागेश्वर विद्यामंदिरात शैक्षणिक साहित्याचे वाटप

रत्नागिरी : शहरातील एक जुनी व नामांकित संस्था म्हणून ओळख असणारी राधाकृष्ण पतसंस्था नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. याच माध्यमातून आज संस्थेच्या वतीने श्री भागेश्वर विद्यामंदिर पेठकील्ला या नगर पालिकेच्या शाळेत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. 

यावेळी राधाकृष्ण पतसंस्थेचे अध्यक्ष हेमंत वणजु, उपाध्यक्ष गणेश भिंगार्डे, संचालय धनेश रायकर, मिलिंद दळी, शाखा व्यवस्थापक प्रथमेश पाथरे, शाळेचे मुख्याध्यापक सदाशिव चौगुले, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या शाळेमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुले  शिक्षण घेतात. अशा मुलांना शिक्षण घेताना अनेक गोष्टींची गरज असते. अनेक सामाजिक संस्था अशा मुलांना नेहमीच मदत करीत असतात. याच हेतूने आज राधाकृष्ण पतसंस्थेच्या वतीने या विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:10 19-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow