चिपळूण : हृदयविकाराच्या झटक्याने गुराख्याचा मृत्यू

Aug 10, 2024 - 11:22
 0
चिपळूण : हृदयविकाराच्या झटक्याने गुराख्याचा मृत्यू

चिपळूण : तालुक्यातील मुंढे पायरवाडी येथे गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका ४८ वर्षीय प्रौढाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. श्रीराम अनंत शिर्के (रा. मुंढे पायरवाडी) असे त्यांचे नाव आहे.

ते दि. ३ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वा. गुरे चारण्यासाठी गेले होते. ते घरी न आल्याने दि. ५ ऑगस्ट रोजी शिरगाव पोलिस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती. मात्र, दि. ८ रोजी दु. त्यांचा मृतदेह रानामध्ये आढळून आला. या प्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 10-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow