पूजा खेडकरांविरोधात मोठी कारवाई; UPSCने दाखल केला एफआयआर

Jul 19, 2024 - 15:08
 0
पूजा खेडकरांविरोधात मोठी कारवाई; UPSCने दाखल केला एफआयआर

नवी दिल्ली : महाराष्ट्र संवर्ग प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आयएएस अधिकारी बनण्यासाठी पूजा खेडकर यांनी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याची चर्चा आहे.

यासोबत पूजा यांचे कुटुंबीयही या वादात सापडले आहेत. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पुणे पोलिसांनी शेतकऱ्याला बंदूक दाखवून धमकावल्याप्रकरणी अटक केली. दुसरीकडे आता पूजा खेडकरांवर देखील केंद्रीय लोकसेवा आयोगाने मोठी कारवाई केली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर विरोधात एफआयआर दाखल केला आहे. तसेच युपीएससीने खेडकर यांना नोटीस बजावून कागदपत्रांच्या अनियमिततेबाबत उत्तर मागितले आहे. तुमची उमेदवारी रद्द का करू नये, अशी विचारणा देखील युपीएससीने खेडकरांकडे केली आहे. पूजा खेडकर यांच्यावर ओबीसी कोट्यासाठी फसवणूक केल्याचा आरोप आहे. याशिवाय सेवेत रुजू झाल्यानंतर त्या चुकीच्या मागण्या करू लागल्या होत्या. ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांची फाईल उघडली असता एकामागून एक त्रुटी आढळून आल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:32 19-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow