लांजात फणस संशोधन केंद्राला मंजुरी : पालकमंत्री उदय सामंत

Jul 20, 2024 - 10:50
Jul 20, 2024 - 14:35
 0
लांजात फणस संशोधन केंद्राला मंजुरी : पालकमंत्री उदय सामंत

लांजा : रत्नागिरी जिल्ह्यातील लांजामध्ये फणस संशोधन केंद्राला राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आली असून, लांजा कृषी केंद्र जागेतच संशोधन केंद्र होणार असल्याची माहिती लांजा येथे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांना दिली. लांजा येथे कृषी महाविद्यालय होणार असल्याचेही पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

लांजा तालुक्यातील फणस संशोधन केंद्राचा प्रस्ताव रखडला होता. यावर आमदार शेखर निकम यांनी पावसाळी अधिवेशनात फणस संशोधन केंद्राबाबत लक्षवेधी मागणी केली होती. या केंद्राचा प्रस्ताव राज्य शासनाला कोकण कृषी विद्यापीठाने सादर केला असून, अद्याप या केंद्राच्या जागेबाबतचा प्रश्न निकालात नाही. राज्य शासनाकडून हिरवा कंदील नसल्याने बहुचर्चित फणस संशोधन केंद्र रखडले आहे. अद्याप या केंद्राची जागा कुठे निश्चित करावी याची स्थिती नाही. पावसाळी अधिवेशनात यावर चर्चा करून मूर्त स्वरूप यावे, अशी मागणी लांजातील शेतकऱ्यांनी केली होती. लांजा येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कार्यक्रमासाठी पालकमंत्री उदय सामंत आले होते. पत्रकारांनी याबाबबत त्यांचे लक्ष वेधले असता पालकमंत्री यांनी लांजा येथे फणस संशोधन केंद्र मंजूर झाले असल्याचे त्यांनी सांगितले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:59 PM 20/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow