दिल्ली-केरळ प्रवासात मंगला एक्स्प्रेसमधील प्रवाशाचा मृत्यू

Sep 16, 2024 - 12:13
 0
दिल्ली-केरळ प्रवासात मंगला एक्स्प्रेसमधील प्रवाशाचा मृत्यू

लांजा : मंगला एक्स्प्रेसने दिल्ली ते कन्नूर (केरळ) असा प्रवास करत असताना छातीत अचानक कळ आल्याने वृद्ध प्रवासी रुग्णाला उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात उपचाराआधीच या प्रवाशाचा प्रवासी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ही दीर्घ पल्ल्याची ट्रेन लांजा तालुक्यातून धावत असताना घडली. या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून लांजा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पवित्रण रामण पण्णी (७१, रा. पूरक्कलम, केरळ) असे मृत पावलेल्या वयोवृद्ध व्यक्तीचे नाव आहे.

या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पवित्रण पण्णी व त्यांचा मुलगा शरद पवित्र पण्णी (२९, पूरक्कलम, केरळ) हे दोघे दिल्ली येथून आपल्या केरळ येथील पुरक्कलम, कन्नूर येथे मंगल एक्स्प्रेसने निघाले होते. त्यांची गाडी लांजा तालुक्यातील आडवली येथे शुक्रवारी ११. ३० वाजण्याच्या सुमारास क्रॉसिंगसाठी थांबली होती. यावेळी पवित्रण रामण पण्णी यांच्या छातीमध्ये दुखत असल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांचा मुलगा शरद पण्णी याने पवित्रण यांना लांजा ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेला. मात्र, येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासले असता पवित्रण पण्णी यांना उपचाराआधीच मृत झाल्याचे घोषित केले. या घटनेबाबात लांजा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 PM 16/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow