नाचणे शाळेत शिक्षण सप्ताह

Jul 22, 2024 - 12:50
 0
नाचणे शाळेत शिक्षण सप्ताह

रत्नागिरी : नाचणे नं.1 शाळेत महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग आयोजित शिक्षण सप्ताह अंतर्गत अध्ययन अध्यापन साहित्य निर्मिती कक्षाचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी प्रा.सुधाकर मुरकुटे यांच्या हस्ते करण्यात आले.
        

यावेळी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्य निर्मिती केली होती. बाल वाचन कट्टा अंतर्गत मुलांनी वाचनाचा आनंद लुटला. सातवीतील मुलांनी विज्ञान या विषयावर साहित्य निर्मिती करून सादरीकरण केले.
     
यावेळी केंद्रप्रमुख रेहाना म्हसकर, मुख्याध्यापक अनुप्रीता आठल्ये, पदवीधर शिक्षक दीपक नागवेकर, अश्विनी पाटील, शरदिनी मुळ्ये, विनोदीनी कडवईकर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:16 22-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow