सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे‘खेकडा पालन : व्यवस्थापन’ प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

Jul 23, 2024 - 10:08
 0
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे‘खेकडा पालन : व्यवस्थापन’ प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

◼️ सामुदायिक प्रयत्नाद्वारे खेकडा पालन करावे : डॉ. मनोहर चांडगे

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ, दापोली अंतर्गत ‘झाडगाव रत्नागिरी येथे असलेल्या ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र मध्ये “खेकडा पालन: व्यवस्थापन” या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दि. १८ ते २० जुलै, २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आला. या प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून विशेषतः मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग व रत्नागिरी येथून तसेच गोवा आणि आंध्रप्रदेश राज्यातुन  आलेल्या एकूण २७ प्रशिक्षणांर्थीनी त्याचा लाभ घेतला.

या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत तीन दिवसात सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी मधील डॉ. एस. डी. नाईक, डॉ. ए. यु. पागरकर, डॉ. एच. बी. धमगाये, प्रा. एन. डी. चोगले, प्रा. एस. बी. साटम, प्रा. के.एम. शिंदे  व श्रीम. व्ही. आर. सदावर्ते  या विषय तज्ञांनी खेकडा पालन विषयी मार्गदर्शन केले. तसेच श्री. के.एम. शिंदे यांनी विकसित केलेले बंधिस्त खेकडा पालन संच तंत्रज्ञान प्रशिक्षानार्थिना प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. बाहयविषय तज्ञ म्हणून आलेले डॉ. शशिकांत मेश्राम, संशोधन अधिकारी, तारापोरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, मुंबई  यांनी ‘खाद्य व्यवस्थापन’ तसेच डॉ. विवेक वर्तक, मत्स्यशास्त्रज्ञ, खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल, जि. रायगड यांनी ‘खेकड्यांच्या विविध जातींची ओळख आणि खेकडा पालनाच्या विविध पध्दती’ या विषयांवर मार्गदर्शन केले. खेकडा पालन प्रकल्प अहवाल व अर्थशास्त्र या विषयावर डॉ. केतन चौधरी, विभाग प्रमुख, मत्स्य अर्थ व विस्तार विभाग,  मत्स्य महाविद्यालय, शिरगाव यांनी मार्गदर्शन केले. 

या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप समारंभ दि. २०  जुलै, २०२४ रोजी डॉ. मनोहर चांडगे (निवृत्त विस्तार शिक्षण विभाग प्रमुख, मत्स्य महाविद्यालय, शिरगाव) यांच्या उपस्थितीत पार पडला. डॉ. मनोहर चांडगे हे सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र येथील सर्वच शास्त्रज्ञांचे शिक्षक असल्याने गुरुपौर्णिमाचे औचीत्त्य साधून संशोधन केंद्र प्रमुख व वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. सुरेश नाईक यांनी त्यांचा शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देउन स्वागत व यथोचित सत्कार केला. 

यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. मनोहर चांडगे यांनी आपल्या भाषणामध्ये प्रशिक्षानार्थिना मार्गदर्शन करताना ‘प्रशिक्षणार्थिनी संघ स्थापन करून सामुदायिक प्रयत्नाद्वारे खेकडा पालन करावे’ असे आवाहन केले. यावेळी डॉ. सुरेश नाईक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्रशिक्षाणार्थिना मार्गदर्शन करताना ‘प्रशिक्षणांर्थीना देण्यात आलेल्या ज्ञानाचा आणि प्रमाणपत्राचा ऊपयोग आपला व्यवसाय करण्यासाठी करावा, तसेच भविष्यात या केंद्राचे सहाय्य घेऊन यशस्वी खेकडा उद्योजक बनावेत अशी इच्छा व्यक्त केली’. सदर प्रशिक्षण कार्यक्रम बाबत आपले अनुभव कथन करताना प्रशिक्षणार्थीनी (श्री. जेसम परेरा, गोवा व श्रीमती. मधुरा घोळप, पुणे) सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केल्याबद्दल संशोधन केंद्राचे आभार व्यक्त केले आणि मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या व्यवसायामध्ये करण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी श्री. कल्पेश शिंदे व डॉ. हरिष धमगाये प्रशिक्षण कार्यक्रम समन्वयक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. समारोप कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. आसिफ पागरकर (सहयोगी संशोधन अधिकारी) यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. सचिन साटम (सहाय्यक संशोधन अधिकारी) यांनी केले. 

सदर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजनाकरिता डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे आदरणीय कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. पराग हळदणकर, संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र प्रमुख डॉ. एस.डी. नाईक यांचे मार्गदर्शन खाली डॉ. आसिफ पागरकर, डॉ. हरीश धमगाये, प्रा. नरेन्द्र चोगले, प्रा. सचिन साटम, प्रा.  कल्पेश शिंदे व श्रीम. वर्षा सदावर्ते यांनी मेहनत घेतली. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन करिता संशोधन केंद्रातील कर्मचारी श्री. मंगेश नांदगावकर, श्री. महेश किल्लेकर, श्रीमती जाई साळवी, श्री. सचिन पावसकर, श्री. मनिष शिंदे, श्री. दिनेश कुबल, श्री मुकुंद देऊरकर, श्री. राजेंद्र कडव, श्री. सुहास कांबळे, श्री. सचिन चव्हाण, श्री. प्रवीण गायकवाड, श्री. दर्शन शिंदे, श्री. तेजस जोशी, श्री. स्वप्नील आलीम, श्री. योगेश पिलणकर, श्री. उल्हास पेडणेकर, श्री. अभिजित मयेकर यांनी विशेष मेहनत घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 23-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow