लांजात मुसळधार पावसामुळे नुकसान

Jul 23, 2024 - 10:09
 0
लांजात मुसळधार पावसामुळे नुकसान

लांजा : सोमवारी पावसाचा जोर ओसरला असला तरी काजळी नदीच्या पाण्याचा प्रवाह कमी झालेला नाही. नदीची पाण्याची स्थिती इशारा पातळीवर होती. गेले दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने लांजा तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. गुरांचे गोठे तसेच घरांवर वृक्ष पडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

दोन दिवस पडलेल्या पावसाचा फटका महावितरणलाही बसला. महावितरणचे सहा विद्युत खांब कोसळून पडले. त्यामुळे काही ठिकाणी नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. मात्र, कुठेही जीवीत हानी झालेली नाही. पावसामुळे काजळी मुचकुंदी नदीला आलेली पूरस्थिती कमी झालेली नाही. नदीचे पाणी ओसरत नसून इशारा पातळीपर्यंत होते. दोन दिवस उसंत न घेता पाऊस कोसळत होता त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. महामार्गासह अंर्गत वाहतूकही रोडावली होती. महावितरणचे निवसर येथे तीन, पन्हळे एक, केळंबे दोन, खेरवसे एक असे एकूण सहा विद्युत खांब कोसळून पडले. यासह संततधार पावसामुळे तालुक्यातील संजय आत्माराम पत्याणे (रा. वात्रट) यांचा गोठा कोसळून १२००० रू नुकसान, राजाराम कदम (गाव-इसवली) यांचा गोठा कोसळून ११००० रू. नुकसान, दीपक पांडुरंग रेवाळे (गाव भडे) यांच्या घरावर, यशवंत भानू कुर्तडकर (गाव उपळे) तर प्रतीक्षा प्रकाश केळंबेकर (गाव- कळंबे) या शेतकऱ्यांच्या घरावर झाडे पडल्यामुळे पत्रे फुटून मोठे नुकसान झाले तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. शनिवारी व रविवारी असा दोन दिवस पडलेल्या पावसाने लांजा तालुक्यात नुकसान झाले आहे. तालुका प्रशासनाकडून नुकसानीची माहिती घेतली जात आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 23/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow