गणेशभक्तांसाठी कोकण रेल्वे मार्गावर दिवा ते चिपळूण गाडी धावणार

Sep 5, 2024 - 10:19
Sep 5, 2024 - 12:35
 0
गणेशभक्तांसाठी कोकण रेल्वे मार्गावर दिवा ते  चिपळूण गाडी धावणार

चिपळूण : गणेशभक्तांसाठी कोकण रेल्वे मार्गावर दिवा ते चिपळूण दरम्यान डेमू सुरू करण्यात आली आहे. एसटीच्या संपाच्या पार्श्वभूमीवर या डेमू गाडीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दररोज दिवा रेल्वेस्थानकातून ही गाडी चिपळूणकडे निघणार आहे.

१ सप्टेंबरपासून दिवा-चिपळूण डेमू ट्रेन सुरू करण्यात आली आहे. दिवा स्थानकातून दररोज सकाळी ७ वा. ती चिपळूणच्या दिशेने निघेल व सर्व थांबे घेत ती दुपारी २ वाजेपर्यंत चिपळूण रेल्वे स्थानकात पोहोचेल. यानंतर दु. ३ वा. पुन्हा चिपळूणहून दिव्याकडे जायला निघेल.

चिपळूण, खेडमधील प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने ही गाडी सुरू केली आहे. यामुळे गणेशभक्तांना दिलासा मिळणार आहे.

दरवर्षी गणेशोत्सव, शिमगोत्सव आणि मे महिन्यामध्ये चिपळुणातील चाकरमान्यांची परवड होते. कोकण रेल्वेमधून उभ्यानेच येथील लोकांना प्रवास करावा लागतो. त्यामुळे गेल्या तीन वर्षापासून चिपळूण ते दिवा अशी खास गणपती स्पेशल डेमू ट्रेन सुरू करण्यात आली आहे.

या गाडीचा फायदा खेड परिसरातील दापोली, मंडणगड व पोलादपूर येथील लोकांना होणार आहे तर चिपळूण स्थानकातून चिपळूण, खेड, गुहागर, संगमेश्वर, कोयना, पाटण येथील लोकांना या डेमू ट्रेनचा मोठा फायदा होणार आहे.

त्यामुळे या डेमू ट्रेनचा चाकरमान्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 PM 05/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow