संगमेश्वर : शिवणे ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावर कचराच कचरा

Jul 23, 2024 - 14:48
 0
संगमेश्वर : शिवणे ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावर कचराच कचरा

संगमेश्वर : संगमेश्वर देवरूख मार्गावर शिवणे ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावर ठेवण्यात आलेल्या प्लास्टिक कचराकुंडीत कचरा पूर्णपणे भरून गेला आहे. ग्रामपंचायतीने या कचराकुंडीकडे त्वरित लक्ष देऊन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मागणी होत आहे. संगमेश्वर-देवरूख मार्गावर आणि बुरंबी हायस्कूलसमीर कचराकुंडी ठेवण्यात आली आहे.

या कचराकुंडीमध्ये कचरा पूर्णपणे भरून गेला आहे. यातील प्लास्टिकचा कचरा इतर ठिकाणी विखुरला जाऊ लागला आहे, या ठिकाणाहून अनेक विद्यार्थी ये-जा करत असतात. कचराकुंडीतील कचऱ्यामुळे आणि दुर्गंधीमुळे परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने त्वरित या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:13 PM 23/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow