गावतळेत झाड पडून श्रीमान मधूरभाई - बुटाला हायस्कूलच्या स्वच्छतागृहाचे नुकसान
गावतळे : श्रीमान मधूरभाई - बुटाला हायस्कूल व ज्युनियर कॉलेज गावतळे येथे २४ जुलैला मध्यरात्री आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे झाड पडून मुलींच्या स्वच्छतागृहाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याची माहिती मिळताच टेटवली सजाचे तलाठी शिंदे यांनी जाग्यावर जाऊन पंचनामा केला. स्वच्छतागृहाचा पत्रा, भिंत व दरवाजा याचे नुकसान झाले आहे. गावतळेच्या सरपंच विधी पवार, पंचक्रोशी स्कूल समिती अध्यक्ष एन. वाय. पवार, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक देवरूखकर यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 26/Jul/2024
What's Your Reaction?