विशाळगड हल्ल्याबाबत लांजात 'उबठा'च्या वतीने निषेध

Jul 23, 2024 - 10:09
Jul 23, 2024 - 16:31
 0
विशाळगड हल्ल्याबाबत लांजात 'उबठा'च्या वतीने निषेध

लांजा : विशाळगड येथे झालेल्या भ्याड हल्ल्याबाबत लांजा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. तसेच संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे मागणीचे निवेदन लांजा तहसीलदारांच्या मार्फत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विशाळगडच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावात काही लोकांनी निरपराध आणि निष्पाप लोकांवर जो हल्ला केला तो अतिशय निंदनीय असा आहे. शिवकालीन गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखले गेले पाहिजे ही शिवसेनेची देखील आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अठरापगड जातीतील मावळ्यांच्या पराक्रमाच्या खुणा विशाळगडावर असून त्या पुढील पिढीला समजायला पाहिजेत. त्यासाठी गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखले गेले पाहिजे. विशाळगडावरील अनधिकृत बांधकामाच्या नावाखाली तेथून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या गजापूर या गावात दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या दृष्टीने जो प्रयत्न झाला तो अतिशय निंदनीय असा आहे.

वास्तविक पाहता ही बाब न्यायप्रविष्ट असताना कायदा हातात घेवून वाहनांची, घरांची जाळपोळ करणे, महिला व लहान मुलांवर हल्ला करणे, मशिदीची तोडफोड करणे, घरांची नासधूस करणे योग्य नाही. त्यामुळे या घटनेचा लांजा ( तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध करण्यात येत आहे.

दरम्यान, हे निवेदन सादर करताना लांजा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख संदीप दळवी, महिला आघाडी तालुका संघटिका लिला घडशी, युवासेना युवती तालुका अधिकारी दीपाली दळवी-साळवी, लांजा तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष परवेश घारे, नगरसेवक राजेश हळदणकर, शहरप्रमुख नागेश कुरुप, शहर संघटिका छाया गांगण, स्वरूप गुरव, यांच्यासह मोहन तोडकरी, नितीन शेट्ये, बशीर मुजावर, चंद्रकांत परवडी, मंगेश मुळे, सुभाष लाखण, इब्राहिम नाईक, आरबाज नेवरेकर, नाना मानकर, अल्लाउद्दीन नेवरेकर, अल्ताफ शेख, यासिन नेवरेकर आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:57 PM 23/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow