रत्नागिरी : बेवारस मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन

Jul 26, 2024 - 10:49
Jul 26, 2024 - 11:50
 0
रत्नागिरी : बेवारस मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन

रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयात बेवारस अवस्थेत सापडून आलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्याबाबत शहर पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.

हनुमंत विठ्ठल कांबळे (६५, रा. सावंतवाडी, सिंधुदुर्ग नक्की पत्ता समजून येत नाही) यांचा गुरुवार १८ जुलै रोजी रात्री ११.४५ वा. जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांचे कोणीही नातेवाईक मिळून आलेले नाहीत. उंची सुमारे ५.२ फूट, बांधा सडपातळ, रंग सावळा, केस पुढे टक्कल मागे सफेद काळे केस, अंगात नेव्ही ब्ल्यू रंगाचा त्यावर उभ्या पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या असलेला फूल शर्ट व नेसणीस खाकी रंगाची हाफ पॅन्ट आहे.

या मृत वृद्धाबाबत माहिती असल्यास नागरिकांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाणे ०२३५२-२२२३३३ किंवा मोबाईल क्र. ८७६७८९५८९ याव संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 26-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow