रिचार्जच्या किमती वाढल्यानंतर सिम पोर्टिंगचा रेकॉर्ड मोडला..

Jul 29, 2024 - 14:31
 0
रिचार्जच्या किमती वाढल्यानंतर सिम पोर्टिंगचा रेकॉर्ड मोडला..

नवी दिल्ली : खाजगी टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel आणि Vodafone Idea(vi) ने या महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्या सर्व रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवण्याची घोषणा केली होती.

याचा फायदा घेत सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने अनेक स्वस्त प्लॅन आणले. त्यामुळे ग्राहकांचा BSNL मध्ये सिम पोर्ट करण्याचा कल वाढला. हा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

100 कोटींचा टप्पा पार
डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्यूनिकेशन (DoT) कडून मोबाईल युजर्सना नंबर न बदलता आपली टेलिकॉम कंपनी बदलण्याची सुविधा मिळते. उदा- तुम्ही एअरटेल सिम वापरता, पण आता तुम्हाला नंबर न बदलता दुसऱ्या कंपनीचे सिम घ्यायचे आहे. आया संपूर्ण प्रक्रियेला पोर्टिंग म्हणतात. दूरसंचार विभागाच्या रिपोर्टनुसार, 6 जुलैपर्यंत मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी सेवेने 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) नुसार, भारतात दर महिन्याला सरासरी 1.1 कोटी मोबाईल सिम पोर्ट रिक्वेस्ट मिळतात.

सिम कार्डसाठी नियम बदलले
यापूर्वी एखादा युजर कुठल्याही कारणाने ताबडतोब त्याचा नंबर दुसऱ्या सिमकार्डमध्ये ट्रांसफर करू शकत होता. पण आता नवीन नियमांनुसार, युजरला 7 दिवसांपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. सिम स्वॅपिंग फसवणूक रोखणे आणि सुरक्षा मजबूत करण्यासाठी हा नियम आणण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:58 29-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow