Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण..

Aug 27, 2024 - 14:51
 0
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण..

सराफा बाजारात मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. आयबीजेएच्या दरानुसार आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ७१८६४ रुपयांवर आला, जो सोमवारच्या बंद दरापेक्षा १७८ रुपयांनी स्वस्त आहे.

चांदी मात्र ५२ रुपयांनी घसरून ८६१३९ रुपयांवर आली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (आयबीजेए) सोन्या-चांदीचे हे दर जाहीर केले आहेत. या दरामध्ये जीएसटी आणि दागिने बनविण्याचं शुल्क आकारलं जात नाही. आपल्या शहरात सोन्या-चांदीचे दर १००० ते २००० रुपयांनी महाग असण्याची शक्यता आहे.

आयबीजेए दिवसातून दोनदा दुपारी आणि संध्याकाळी सोन्याचे दर जाहीर करते. अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जारी केलेल्या विविध अधिसूचनेनुसार हे दर सॉवरेन आणि बाँड जारी करण्यासाठी बेंचमार्क दर आहेत. आयबीजेएची २९ राज्यांमध्ये कार्यालयं आहेत आणि ती सर्व सरकारी संस्थांचा भाग आहे.

दुसरीकडे, दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७४२०३ रुपये झालाय. सोमवारी त्याची किंमत ७२४६६ होती. तर दिल्लीत चांदीचा भाव ७६,५१० रुपये आहे. सोमवारी चांदीचा भाव ८४,२४० रुपये प्रति किलो होता.

चेन्नई सराफा बाजारात आज सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७३,७९५ रुपये आहे. सोमवारी सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७३,१७९ रुपये होता. आज दिल्लीत चांदीचा भाव प्रति किलो ७६,५१० रुपये आहे. सोमवारी चांदीचा भाव ८४,१६० रुपये प्रति किलो होता.

मुंबईच्या सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७४,१३१ रुपये होता, तर सोमवारी सोन्याचा भाव ७३,३९३ रुपये प्रति १० ग्रॅम होता. मुंबईत आज चांदीचा भाव ८६,४५० रुपये प्रति किलो आहे. सोमवारी चांदीचा भाव ८४,२४० रुपये प्रति किलो होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:10 27-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow