राजापूर बाजारपेठेत मंदी..

Jul 29, 2024 - 10:00
Jul 29, 2024 - 16:02
 0
राजापूर बाजारपेठेत मंदी..

राजापूर : गेले पंचवीस दिवस अर्जुना कोदवली नद्यांना सातत्याने पूरस्थिती राहताना तब्बल चारवेळा बाजारपेठेमध्ये पुराचे पाणी घुसले होते. या पूरस्थितीमुळे बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. बाजारपेठेमध्ये लावणीच्या हंगामामुळे मंदी होती.

त्याचवेळी आलेल्या पुरामुळे व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. भातशेतीच्या हंगामामुळे बाजारपेठेत आर्थिक मंदी आहे. तसेच गेल्या पंचवीस दिवसांमध्ये सुमारे दहा ते पंधरा दिवस पुराची टांगती तलवार असल्याने व्यापारी हतबल झाले आहेत. या पूरस्थितीमुळे सुमारे वीस-पंचवीस कोटींची उलाढाल ठप्प इाली आहे. पावसाचा जोर वाढला की अर्जुना कोदवली नदीच्या पाण्यामध्ये वाढ होऊन पुराचे पाणी बाजारपेठेत घुसते. त्यामुळे पावसाच्या वाढणारा जोर लक्षात घेऊन दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी व्यापाऱ्यांची तारांबळ उडते. या कालावधीत माल वाचिवण्याला प्राधान्य असल्याने ग्राहकांनाही चांगली सेवा देता येत नाही. या पूरस्थितीमुळे असलेल्या मंदीमुळे व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

गेल्या पंचवीस दिवसांमध्ये दहा-पंधरावेळा शहरामध्ये पूरस्थिती आहे. त्यामुळे बाजारपेठेतील उलाढालील ब्रेक लागला आहे. आधीच पुरामुळे दुकाने बंद. दुसऱ्या बाजूला पूररेषेमुळे शासनाकडून नुकसानभरपाई मिळत नाही. या अस्मानी संकटाच्या दुष्टचक्रामध्ये व्यापाऱ्यांनी जगायचं कसं? बँकेचे कर्जाचे ह्प्प्ते फेडायचे कसे? राकेश पाटील, व्यापारी, राजापूर

बाजारपेठेतील व्यापारी व दुकानसंख्या
सुवर्णकारः १०, किराणा व जनरल स्टोअर्सः ५०, एजन्सीजः २५, स्टेशनरी व नॉव्हेल्टीजः २०, कापड दुकानेः १५, हॉटेलः २०, इलेक्ट्रिकल्सः १५, फर्निचर व हार्डवेअरः १५, बेकरी व स्वीटमार्ट १०, मेडिकल्सः ६, भांडी व्यापारीः १०, चिकन, मटण सेंटरः ५ यात फोटोग्राफर्स झेरॉक्स-प्रिटिंगप्रेसः १५ फुटवेअर्सः ६, मोबाईल व घडयाळ दुकानेः १०, लॉन्ड्री व टेलर्स २०, पानस्टॉलः २५, भाजी विक्रेतेः ४, टी स्टॉलः ८, सलून व ब्यूटीपार्लरः १५


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:27 PM 29/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow