गुहागर : दुचाकीची म्हशीला धडक बसून तरुणाचा मृत्यू; एक जखमी

Sep 16, 2024 - 10:47
Sep 16, 2024 - 13:53
 0
गुहागर : दुचाकीची म्हशीला धडक बसून तरुणाचा मृत्यू; एक जखमी

गुहागर : तालुक्यातील तवसाळ जेटी येथे शुक्रवारी रात्री ११.३० वाजता फेरफटका मारण्यास गेलेल्या दुचाकीस्वार तरुणाचा म्हशीला दुचाकीची धडक बसल्यामुळे अपघात झाला. निखील कुळे या अपघातात या तरुणाचा मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेला अन्य एकजण यामध्ये जखमी झाला आहे. निखिल दिलीप कुळे (वय २३, रा. काताळे कुळेवाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत सावर्डे पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील काताळे कुळेवाडीतून तीन दुचाकी घेऊन सहा मित्र तवसाळ जेटी येथे रात्री ११.३० वाजता फेरफटका मारण्यासाठी घरातून निघाले. या सर्वांमध्ये निखिल कुळे हा दुचाकी घेऊन पुढे होता. त्याच्या गाडीचा वेग जास्त असल्याने रस्त्यामध्ये अंधारात उभी असलेली म्हैस त्याला दिसली नाही. त्याच्या दुचाकीची ठोकर म्हशीला बसली. हा अपघात गुहागर तालुक्यातील पडवे सपाटावर घडला.

या अपघातात निखिल याच्या डोक्याला व छातीला जोरदार मार बसला, तर त्याच्या मागे बसलेल्या साहील नामक मित्राला मुका मार लागला आहे. या धडकेमध्ये दोघेही खाली पडले. मागून येणाऱ्या मित्रांनी त्यांना तत्काळ डेरवण येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान रात्री १.५३ वाजण्याच्या सुमारास निखिलचा मृत्यू झाला. साहील याच्यावर उपचार सुरू आहेत. कामानिमित्त मुंबई येथे असणारा व मूळ गाव गुहागर तालुक्यातील काताळे कुळेवाडीतील निखिल हा गणेशोत्सवासाठी गावी आला होता. सावर्डे पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, उपचारादरम्यान रात्री निखिलचा मृत्यू झाला. तर जखमी असलेल्या एकावर उपचार सुरू आहेत. या घटनेची खबर सावर्डे पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली असून आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

निखिल दिलीप कुळे याच्या जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार निखिल हा आई- वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:15 PM 16/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow