चिपळूण : शाहनवाज शाह यांना नदी सेवक पुरस्कार प्रदान

Jun 28, 2024 - 11:21
Jun 28, 2024 - 15:26
 0
चिपळूण : शाहनवाज शाह यांना नदी सेवक पुरस्कार  प्रदान

चिपळूण : येथील शाहनवाज शाह गेली २५ वर्षे नदी पर्यावरणाची सेवा करीत आहेत. वाशिष्ठी व जगबुडी नदी तिच्या उपनद्या यांचा उगमापासून मुखापर्यंत नदीचे नैसर्गिक जलस्रोत, पाणलोट क्षेत्र, भौतिक बदल पर्यावरणीय बदल, जैव विविधता, वहनक्षमता याचा गेली अनेक वर्षे अभ्यास करीत आहेत. पर्यावरणाकरिता आंदोलने व उपोषणे सुद्धा केलेली आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना जलबिरादारी महाराष्ट्र या संस्थेने जलपुरुष राजेंद्र सिंह व आमदार शेखर निकम यांचे हस्ते नदी सेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी श्रीराम रेडीज, बापू काणे, अशोक भुस्कुटे, अजित जोशी, मंदार चिपळूणकर आदींमुळे हे काम शक्य झाल्याची भावना शाह यांनी व्यक्त केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:49 PM 28/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow