राजापूर : संतप्त रिक्षाचालकांचे खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण

Jul 30, 2024 - 09:53
Jul 30, 2024 - 09:55
 0
राजापूर : संतप्त रिक्षाचालकांचे खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण

राजापूर : राजापूर शहरातील मुख्य रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे समस्त नागरिक त्रासले असतानाच सोमवारी तर उद्रेक झाला न. प. प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याने संतापलेल्या राजापूरमधील रिक्षा चालकांनी सोमवारी जवाहर चौकातील खड्यात वृक्षारोपण करून आपला संताप व्यक्त केला. दरम्यान, शहराकडे येणाऱ्या या मुख्य रस्त्याची दाणादाण उडत असताना न. प. प्रशासन मात्र गप्प असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सुमारे पावणे दोन कोटी रुपये खर्च करून राजापूर शहराकडे येणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम करण्यात आले होते. हा रस्ता बनवून सहा महिने झाले नाहीत तोच सुरू झालेल्या पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडायला सुरुवात झाली. या संपूर्ण मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटार व्यवस्था नसल्याने पावसाचे पडणारे पाणी रस्त्यावरूनच वाहत जात असल्याने रस्त्या खराब झाला आहे. या रस्त्यावर प्रामुख्याने जवाहर चौकासह कुशे मेडिकल स्टोअर्स ते सुपर बाजार या पूर्ण परिसर त्यानंतर जुन्या हॉस्पिटलच्या वरील बाजूचे वळण या दरम्यान अनेक खड्डे मार्गावर पडले आहेत. त्यापुढे देखील खड्डे आहेत. एवढा मोठा खर्च करून देखील वर्ष झाले नसल्याने शहराकडे येणारा हा महत्त्वाचा मार्ग खड्डेमय बनल्याने त्याचा त्रास शहरात नित्य ये- जा करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना होत आहे तर रस्त्यावरील चिखलमिश्रित पाणी अंगावर फेकले जात असल्याने कपडे खराब होत असल्याने नागरीक सुद्धा त्रस्त आहेत. शहरातील मुख्य रस्त्याची दुरवस्था होत असतानाच न. प. प्रशासन मात्र त्याबाबत काहीच कार्यवाही करीत नसल्याने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. तरी देखील प्रशासनाने अजिबात लक्ष न दिल्याने अखेर स्थानिक रिक्षा व्यावसायिकांचा संयम संपला आणि त्यांनी सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास जवाहर चौकातील पडलेल्या एका खड्यात चक्क वृक्षारोपण केले. यावेळी रिक्षा संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 30/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow