पावस येथे मासेमारीसाठी गेलेल्या वृद्धाचा बुडून मृत्यू

Jul 30, 2024 - 10:50
 0
पावस येथे मासेमारीसाठी गेलेल्या वृद्धाचा बुडून मृत्यू

रत्नागिरी : तालुक्यातील पावस येथे मासेमारी करण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (२७ जुलै) दुपारी २ वा. सुमारास उघडकीस आली. अनिल गंगाराम पानगले (५८, रा. पानगलेवाडी पावस, रत्नागिरी) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. 

शनिवारी सकाळी ८.३० वा. सुमारास ते गावाजवळील खाडीत मासेमारी करण्यासाठी जातो, असे सांगून घरातून बाहेर पडले होते. बराच वेळ झाल्यानंतर ही घरी न परतल्यामुळे त्यांची पत्नी अर्चना पानगले यांनी गावातील लोकांना याबाबत माहिती दिली. त्यांची अनिल पानगले यांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता खाडीकिनारी पुलाजवळ पाण्याच्या खाली झाडीमध्ये त्यांना अनिल पानगले हे अडकलेले दिसून आले. रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 30-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow