रत्नागिरीतील विशाल भोसले यांची पंढरपूरपर्यंत सायकलस्वारी

Jul 30, 2024 - 11:08
Jul 30, 2024 - 16:19
 0
रत्नागिरीतील विशाल भोसले यांची  पंढरपूरपर्यंत सायकलस्वारी

रत्नागिरी : पंढरपूरची वारी म्हटले की आपल्याला आठवतात ते पायी जाणारे असंख्य वारकरी.. तहान भूक विसरून मुसळधार पावसाची तमा न बाळगता हजारो वारकरी ही वारी पूर्ण करतात.. विठ्ठलाच्या ओढीने रत्नागिरीतील एक सायकलस्वारही भारावला.. त्यानेही पंढरपूरला जाण्याचा निर्धार केला.. मात्र हा प्रवास सायकलवरून करत पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचा निर्णय घेत त्यांनी पंढरपूर गाठले.

रत्नागिरीतील विशाल संताजी भोसले त्यांनी हा प्रवास एका दिवसामध्ये सुमारे ३१० किलोमीटर सायकल चालवत पूर्ण केला. व्यावसायिक असलेले, वयाची ४० पार केलेले विशाल भोसले पर्यावरण संर्वधन तसेच झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश देत पंढरपूर येथे पोहचले. त्यांचा हा प्रवास पहाटे ५ वाजता सुरू झाला. ते सायंकाळी ७ वा. ते पंढरपूर येथे पोहोचले. त्यांनी रत्नागिरी ते उंब्रज हा प्रवास पूर्णतः एकट्याने केला, उंब्रज ते पंढरपूर या प्रवासात त्यांच्यासोबत उंब्रज सायकल रायडरचे सदस्य होते.

ते म्हणाले की, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब यांच्याबरोबर सर्वप्रथम खेडशी ते गजानन महाराज मंदीर, गोळप याठिकाणी सायकलिंग केली. त्यानंतर चिपळूण येथे कुंभार्ली घाट ही किंग ऑफ कुंभार्ली स्पर्धा केवळ २ तासात सर केल्यामुळे माझ्या आत्मविश्वासात वाढ झाली. यामुळे मी सायकलवरून पंढरपूरला जाण्याचा निर्णय घेतला. सर्व वयोगटातील लोकांनी शारीरिक दृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी रोज सायकल चालवाव, असे आवाहनही यावेळी भोसले यांनी केले. पुढच्या वारीला रत्नागिरीतून बहुसंख्य लोकांना सायकलवरून नेण्याचा मनोदयही भोसले यांनी व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:34 PM 30/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow