चिपळूण : नारायण तलाव परिसरातील स्वच्छतेला गालबोट 

Jun 11, 2024 - 11:07
Jun 11, 2024 - 17:04
 0
चिपळूण : नारायण तलाव परिसरातील स्वच्छतेला गालबोट 

चिपळूण : नारायण तलावावर दोन दिवसांत प्रचंड गर्दी होती. चार वाजल्यानंतर तिथे जत्राच भरते. चिपळूणकरांचा चांगला प्रतिसाद मिळतो, परंतु काही लोकांकडून होत असलेल्या चुकांमुळे परिसरातील स्वच्छतेला गालबोट लागते. पूर्वी वरिश्वर तलावाची प्लास्टिकच्या बॉटल, कचरा गुटख्याची पाकिटे आणि बरंच काही टाकून वाट लावण्यात नागरिकांनी कसर ठेवलेली नाही. तोच प्रकार आता नारायण तलाव परिसरात दिसू लागला आहे. त्यावर वेळीच आळा घातला पाहिजे, अशी मागणी सजग चिपळूणकरांकडून होत आहे.

येथील वॉकिंग ट्रॅकवरून राऊंड घेताना काही ठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्या लॉनसह तळ्याच्या बाजूला आणि काही ठिकाणी बसण्याच्या जागेवर टाकण्यात आल्या होत्या. यावर वेळीच आळा घालण्यासाठी येथे फिरायला येणाऱ्यांनी स्वतःवर बंधने घातली पाहिजेत. नारायण तलावाभोवती ट्रॅकवर फिरण्यासाठी जाताना बाटल्या घेऊन कुणी जाऊ नये. याची अंमलबजावणी स्वतःहून प्रत्येकाने केली पाहिजे. रामतीर्थ व इतर ठिकाणाप्रमाणे ट्रॅकचे पॉईंट इथे होऊ नयेत याची खबरदारोही घेणे आवश्यक आहे. 

अजूनही हा नारायण तलावाचा प्रकल्प पालिकेकडून हस्तांतरित करण्यात आलेला नाही. प्रवेशद्वार आणि विजेची व्यवस्था गेल्या पंधरा दिवसात होणार असल्याची माहिती मिळालेली आाहे. या सुविधा झाल्यानंतर किमान शुल्क ठेवण्याचा निर्णय घेतला पाहिजे. पाण्याच्या बॉटल आतमध्ये घेऊन जायचे आहे, त्या नागरिकांकडून अनामत रक्कम घ्या. कुत्रे किंवा इतर प्राण्यांना आत घेऊन जाण्यास सक्त मनाई करावी.

सुशोभित होत आलेल्या नारायण तलावाचे सौंदर्य टिकण्यासाठी शिस्त लागणे गरजेचे आहे. याआधी वीरेश्वर तलावावर प्लास्टिक बॉटल, कचरा व गुटख्याची पाकिटे आणि बरंच काही टाकून वाट लावण्यात आली होती. तलाव परिसरात प्लास्टिकच्या वाढत्या आढळतात. त्यासाठी नियम करणे गरजेचे आहे तलाव परिसर मेडिटेशन पॉईंट होणे आवश्यक आहे.- सतीश कदम, चिपळूण

तलाव सुशोभीकरणातील अनेक कामे मार्गी लागली. तलाव सभोवाली लोखंडी जाळी मारली जात असून, काही ठिकाणी ती शिल्लक आहे. प्रवेशद्वाराचे काम त्वरित पूर्ण करून एकच प्रवेश मार्ग ठेवावा, तलावाशेजारील आरक्षित असलेली जागा पालिकेने ताब्यात घ्यावी. तेथे वाहनांची पार्किंग तसेच खाद्य पदार्थांचे स्टॉला लावण्यात यावेत. संतोष इनामदार, सचिव, प्रभात रोड फाऊंडेशन

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:22 PM 11/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow