पाली, करबुडे येथे बेकायदा हातभट्टी बाळगणाऱ्यांवर गुन्हा दाखल

Jun 1, 2024 - 10:29
 0
पाली, करबुडे येथे बेकायदा हातभट्टी बाळगणाऱ्यांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी : पाली आणि करबुडे येथे बेकायदेशिरपणे गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी ताब्यात बाळगणाऱ्या दोघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही कारवाई गुरुवार ३० मे रोजी रात्री ९ ते १०.४० वा. कालावधीत करण्यात आली. सुरेंद्र हरिश्चंद्र सावंत (४२, रा. पाली बौद्धवाडी, रत्नागिरी) आणि सुगंधा रामचंद्र भोसले (६०, रा. करबुडे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. यातील सुरेंद्र सावंत हा ४१५ रुपयांची ७ लिटर, तर सुगंधा भोसले ही आपल्या ताब्यात ५२० रुपयांची ५ लिटर दारू बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 01-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow