लांजा : कुरंग रस्ता डागडुजीस सुरुवात

Jun 25, 2024 - 13:25
 0
लांजा : कुरंग रस्ता डागडुजीस सुरुवात

लांजा : तालुक्यातील रिंगणे हायस्कूल ते कुरंगपर्यंत रस्ता खूपच खराब झाला असून, रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक झाला आहे. येथे डागडुजी करावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकामचे अधिकारी यांच्याकडे स्थानिक ग्रामस्थांनी केल्यानंतर तातडीने त्यावर कार्यवाही करण्यास सुरवात झाली आहे.

तालुक्यातील रिंगणे, कोंडगे, कुरंग, झर्ये, आदी गावांकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता आहे. रिंगणे हायस्कूल ते कुरंग गावापर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असल्याने वाहने कसरतीने जीव मुठीत घेऊन चालवावी लागत आहेत, त्यामुळे अपघात होण्याची भीती आहे. रिक्षा, चारचाकी, दुचाकी या गाड्या चालवणे खूपच अडचणीचे ठरत होते. पावसाळ्यात आणखी रस्ता खराब होणार होता. रिंगणे हायस्कूल ते झर्ये रस्ता खड्डेमय झाल्याने तेथून वाहने चालवणे अवघड होत आहे. हे खड्डे तातडीने भरणे आवश्यक आहे. ही बाब उद्योजक किरण सामंत, सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांची सरपंच डॉ. एस. व्ही. कदम यांनी ग्रामस्थांसमवेत प्रत्यक्ष भेट घेतली. याची बांधकाम विभागाने गंभीर दखल घेऊन आजपासून झर्ये येथील खड्डे चिरा दगडाने भरण्याचे काम सुरू झाले आहे. हा रस्ता वाहतुकीस चांगला होणार असल्यामुळे कोंडगे ग्रामपंचायतीच्यावतीने आभार मानण्यात आले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:53 PM 25/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow