रत्नागिरी : छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये लोकशाही पद्धतीने विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवडणूक

Jul 31, 2024 - 10:41
Jul 31, 2024 - 15:48
 0
रत्नागिरी : छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये लोकशाही पद्धतीने विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवडणूक

रत्नागिरी : शहरातील झाडगाव येथीत छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक देण्यात आली. लोकशाही पद्धतीने मतदान प्रक्रिया राबवून जनरल सेक्रेटरी, इतर शालेय मंत्रिमंडळाची निवड करण्यात आली.

निवडणुकीमध्ये १४७ विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावता जनरल सेक्रेटरी पदासाठी मुलांमधून उमेदवार, तर विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून मुलीमधून उमेदवार उभे होते. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे लोकसभा व विधानसभा यांच्या निवडणुका ज्या पद्धतीने पार पडतात त्याच पद्धतीने शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक या वेळी पार पडली. आजचे विद्यार्थी हे उद्याचे भावी नागरिक आहेत. उज्जवल देश घडवण्यासाठी मतदान हे प्रत्येक नागरिकाला करावेच लागते आणि यासाठीच या निवडणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मतपत्रिका तयार करण्यात आल्या होत्या, मतदान कक्ष, मतपेटी, केंद्राअध्यक्ष मतदान अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली होती. संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या लक्षात यावी यासाठी दोन दिवस आधी विद्यार्थ्यांना नियम समजावून सांगून तयारीसाठी पूर्ण वेळ देण्यात आला होता. 

मतदानाच्या दिवशी १०० मीटर रेषा आखण्यात आली होती. निकाल घोषित करत असताना संपूर्णपणे सुसूत्रीपणा आणि नियमाच्या अधीन राहून निकाल घोषित करण्यात आला. पाचवी ते दहावी अखेरच्या सर्व विद्यार्थ्यांना पारदर्शकरीत्या निकाल समजावा यासाठी प्रोजेक्टरची व्यवस्था करण्यात आली होती. मोठ्या पडद्यावर ५ फेऱ्यामध्ये निकाल घोषित करण्यात आला.

जनरल सेक्रेटरी म्हणून आदित्य डांगे निवडून आला तर मुलींमधून विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून ग्रंथा मोरे निवडून आली. निवडमूक निर्णय अधिकारी म्हणून तानाजी गायकवाड यांनी काम पाहिले, मतदान केंद्राध्यक्षा म्हणून दीपक पाटील यांनी काम पाहिले. त्याचबरोबर निवडणूक अधिकारी मतमोजणीचे काम अमोल मंडले, अशोक सुतार, मारूती पाटील, स्वपनाली भुजबळराव सागर कदम यांनी काम पाहिले. निवड झालेल्या जनरल सेक्रेटरी, विद्यार्थिनी प्रतिनिधी व इतर शालेय मंत्रिमंडळातील लवकरच मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात येईल, असे या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी गायकवाड यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:09 PM 31/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow