राज्यभरात सरासरीच्या 138 टक्के जास्त बरसला पाऊस..

Jul 31, 2024 - 15:43
 0
राज्यभरात सरासरीच्या 138 टक्के जास्त बरसला पाऊस..

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. राज्यात जुलै महिन्यात राज्यात सरासरीच्या 138 टक्के जास्त पाऊस झाल्याची माहिती आज पुणे वेधशाळेने (Pune Weather Update)दिली आहे.

संपूर्ण राज्यात पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा जोर कायम (Heavy Rain) राहणार असल्याची माहिती पुणे हवामान (Pune Rain)विभागातील के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी दिली आहे.

राज्यात सरासरीपेक्षा जास्त मुसळधार पाऊस झाल्याची नोंद झाली असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. पुढील 2 ते 3 दिवस कोकण विभागात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील अनेक धरणे 90 टक्के भरले असून पुढील काही दिवस नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केलं आहे. तर पुण्यात देखील पुढील 2 ते 3 दिवस चांगला पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

याबाबत माहिती देताना होसाळीकर म्हणाले, राज्यात सरासरीच्या 138 टक्के जास्त पाऊस झाला आहे. संपुर्ण राज्यात चांगला पाऊस झाला आहे. पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. पुण्यात पुढढील दोन ते तील दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे शहरासह घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

कोणत्या विभागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

कोकण: 41 टक्के सरासरी पेक्षा जास्त

मध्य महाराष्ट्र: 45 टक्के सरासरी पेक्षा जास्त

मराठवाडा: 27 टक्के सरासरी पेक्षा जास्त

विदर्भ: 36 टक्के सरासरी पेक्षा जास्त

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:12 31-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow