वायनाड भूस्खलनात आतापर्यंत २५६ जणांचा मृत्यू, अजूनही अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Aug 1, 2024 - 10:12
 0
वायनाड भूस्खलनात आतापर्यंत २५६ जणांचा मृत्यू, अजूनही अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

वायनाड : केरळ मधील वायनाड जिल्ह्यात सोमवारी झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत २५६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मोठ्या संख्येने लोक जखमीही झाल्याची माहिती आहे, अजूनही अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

आतापर्यंत ३ हजार लोकांची सुटका करण्यात आली आहे. मुसळधार पावसात चिखल, खडक आणि झाडांचे मोठे तुकडे यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत.

लष्कराचे जवान चुरलमाला आणि मुंडक्काई दरम्यान कोसळलेल्या पुलाची पुनर्बांधणी करत आहेत. या पुलामुळे बचावकार्य जलद करता येईल. चुरलमळा ते मुंडक्काईला जोडणारा हा १९० फूट पूल आज दुपारपर्यंत पूर्ण होऊ शकतो.

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वायनाडला रवाना झाले आहेत. ते त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. याआधी दोन्ही नेते बुधवारी वायनाडला जाणार होते, मात्र खराब हवामानामुळे त्यांना जाता आले नाही.

चार गावांना मोठा फटका

वायनाडमध्ये भूस्खलनाने मोठं नुकसान झालं आहे. सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्री वायनाडमध्ये अतिवृष्टी आपत्ती ठरली. पहाटे १ ते पहाटे ५ च्या दरम्यान तीन वेळा भूस्खलन झाले आणि डोंगराच्या खाली असलेल्या चेलियार नदीच्या पाणलोटात वसलेल्या चुरामाला, अट्टमला, नूलपुझा आणि मुंडक्काई या चार गावांमध्ये विध्वंस झाला. गावोगावी मोठमोठे दगड आणि ढिगाऱ्यांचा तडाखा बसला. काही वेळातच शेकडो घरांचे ढिगारे झाले. पुराच्या मार्गात जे आले ते वाहून गेले. झाडेही उन्मळून पडली. गावोगावी मोठमोठे दगड आणि ढिगाऱ्यांचा तडाखा बसला. काही वेळातच शेकडो घरांचे ढिगारे झाले.

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी बुधवारी सांगितले की, एनडीआरएफ, लष्कर आणि इतर एजन्सींनी केलेल्या समन्वित आणि मोठ्या प्रमाणात बचाव मोहिमेमुळे वायनाड जिल्ह्यातील भूस्खलनग्रस्त भागातून १,५०० हून अधिक लोकांची सुटका करण्यात आली.

विजयन म्हणाले, "दोन दिवसांच्या बचाव मोहिमेत १,५९२ लोकांची सुटका करण्यात आली. इतक्या कमी वेळेत इतक्या लोकांना वाचवण्याच्या समन्वित आणि व्यापक ऑपरेशनची ही उपलब्धी आहे. पहिल्या टप्प्यात आपत्तीच्या आजूबाजूच्या भागातील ६८ कुटुंबांतील २०६ लोकांना तीन छावण्यांमध्ये हलवण्यात आले, यात ७५ पुरुष, ८८ महिला आणि ४३ लहान मुलांचा समावेश आहे. भूस्खलनानंतर सुरू असलेल्या बचाव कार्यात अडकलेल्या १,३८६ लोकांना वाचवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 'यामध्ये ५२८ पुरुष, ५५९ महिला आणि २९९ मुलांचा समावेश आहे, या सर्वांना सात शिबिरांमध्ये पाठवण्यात आले आहे. दोनशे एक जणांना वाचवून रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी ९० जणांवर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 01-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow