चिपळूण : पेठमाप येथे आढळली मगर

Aug 2, 2024 - 09:58
 0
चिपळूण : पेठमाप येथे आढळली मगर

चिपळूण : शहराचे उपनगर पेठमाप या ठिकाणी नागरी वस्तीतील एका रहिवाशाच्या घरानजिक झुडुपामध्ये मगरीने शिरकाव केल्याचे निदर्शनास आले. मात्र, जागरूक रहिवाशांनी वन विभागाला याची माहिती देताच वन विभागाने मगरीला पकडून नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. 

पेठमाप नदीकिनारी असलेल्या परिसरात पुन्हा एकदा मगरीने दर्शन दिले आहे. शहरात गेल्या महिनाभरात नागरी वस्तीत मगरीचा शिरकाव होण्याची ही तिसरी घटना आहे. महिनाभरापूर्वी शिवाजी चौकानजिक शिव नदी पुलावर पहाटेच्या सुमारास मगरीचा वावर दिसून आला. त्यानंतर मागील आठवड्यात महामार्गावरील पेट्रोल पंपामध्ये मगर शिरली होती तर आता पेठमाप नदीकिनारी कोंडविलकर यांच्या घराजवळ झुडुपातून मगर आल्याचे दिसले. यानंतर परिसरातील नागरिकांनी वन विभागाला माहिती दिल्यावर वन विभागाने मगरीला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 02-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow