गुहागर : वेळंब येथे आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते सभागृहाचे उद्घाटन

Sep 16, 2024 - 16:58
Sep 17, 2024 - 11:14
 0
गुहागर : वेळंब येथे आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते सभागृहाचे उद्घाटन

गुहागर : गुहागर तालुक्यातील वेळंब घाडेवाडी म्हापार्ले वाडी येथील सार्वजनिक सभागृहाचे आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. आमदार भास्कर जाधव यांचा म्हापार्लेवाडी ग्रामस्थांकडून गणपतीची मूर्ती, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच समीक्षा बारगोडे, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत, प्रवीण ओक, सुनील पवार, ग्रामपंचायत सदस्य सुरेश जाधव, प्रमोद राणे, श्वेताली घाडे, जयश्री जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष नांदलस्कर आदींसह म्हापार्लेवाडी अध्यक्ष रामचंद्र म्हापार्ले, मुंबई अध्यक्ष दत्ताराम घाडे व म्हापार्लेवाडी ग्रामस्थ व महिला मंडळ तसेच गावातील ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:26 PM 16/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow